Nawab Malik : काकांची साथ सोडून दादांना पाठिंबा... राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 'ते' ४२ वे आमदार नवाब मलिक!

  225

शरद पवारांना मोठा धक्का


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) २ जुलै या दिवशी मोठी फूट पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शरदकाका विरुद्ध अजितदादा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गट आपल्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दावे करत आहेत. यावर निवडणूक आयोगात पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक (Nawab Malik) अजितदादांना पाठिंबा देणार आहेत. अजित पवार गटाने आपल्या बाजूला ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार असणार आहेत.


काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची आजारी असल्याच्या कारणामुळे जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर दोनच दिवसांत दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नेत्यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळेस नबाव यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. काही दिवसांत आपला निर्णय कळवेन असं ते म्हणाले होते. त्यांच्या बोलण्यावरुन आणि इतर प्रतिक्रियांवरुन ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता जास्त होती. मात्र, सर्व अंदाज आणि तर्कवितर्क चुकीचे ठरवत नवाब मलिक यांनी अजितदादांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.


निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, अशी माहिती आहे.


राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी