Reservation : आता कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण

नवी दिल्ली : एससी/एसटी/ओबीसी यांना ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांमध्ये सरकारी खात्यांमध्ये आरक्षण (Reservation) दिले जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. आतापर्यंत या समुदायाला केवळ सरकारी नोकरी आणि शिक्षणापुरते मर्यादित आरक्षण होते. मात्र, आता कंत्राटी नोकरीत देखील आरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत.





हे आरक्षण केवळ ४५ किंवा त्याहून अधिक दिवसांच्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दिले जाणार आहे. याबाबत सर्व मंत्रालयांना कळवण्यात आल्याचे केंद्र सरकारने सर्वेच्च न्यायालयात सांगितले. याशिवाय या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले आहे.


जर ४५ दिवसांपेक्षा कमी कंत्राटी नोकरी असेल, तर त्यांना हे आरक्षण लागू होणार नाही. सरकारने दिलेली कंत्राटी नोकरी ही एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी दिली जाते आणि हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात