Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023: सगळं काही विसरा, वर्ल्डकपवर लक्ष द्या...

World Cup 2023: सगळं काही विसरा, वर्ल्डकपवर लक्ष द्या…

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा(Indian cricket team) कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाआधी मोठे विधान केले आहे. कॅप्टन डेच्या निमित्ताने रोहितने सांगितले की आता ही वेळ आपले लक्ष्य केंद्रित करण्याची आहे. टीम इंडियासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे आपल्या घरातच वर्ल्डकप जिंकणे हे आहे.

भारतीय संघाने दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या नजरा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यावर असतील. आयसीसीच्या १३व्या वनडे वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबरपासून होत आहे. स्पर्धेत १० संघ भाग घेणार आहेत. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४८ सामने खेळवले जातील.

भारताने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९मध्ये इंग्लंडने आपल्या धरतीवर खिताब जिंकला होता. आता भारतीय संघ आपल्या मायभूमीत खिताब जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित शर्माचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप असू शकतो.

सर्वकाही विसरून लक्ष केंद्रित करण्याची गरज

रोहितने आयसीसीकडून अहमदाबाद येथे आयोजित कॅप्टन डेच्या निमित्ताने सांगितले, मला माहीत आहे की काय पणाला लागले आहे. जे खेळाडू संघाचा भाग आहेत त्यांनाही ही माहिती आहे की काय पणाला लागले आहे ते. आमच्यासाठी आता सर्व काही विसरून आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याची गरज आहे. रोहितच्या मते संघाने एकावेळेस एका सामन्यावर लक्ष केंद्रित करावे कारण वर्ल्डकपची स्पर्धा ही लांबलचक आहे.

मोठ्या अवधीत चालणारी स्पर्धा

रोहित पुढे म्हणाला, गेल्या तीन विश्वचषकात यजमान देशाने खिताब जिंकला आहे. मोठ्या कालावधीत चालणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे एकदम पुढचा विचार करून चालणार नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की आम्ही प्रयत्न करावा आणि आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -