World Cup 2023: टीम इंडिया थेट विश्वचषकात खेळणार, नाही मिळाली सरावाची संधी

  201

तिरूअनंतपुरम: भारत(india) आणि नेदरलँड्स(netherlands) यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. खरंतर, याआधीही भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात पावसाने खोडा घातल्याने रद्द करावा लागला होता. यामुळे विश्वचषकाआधी भारताला रोहित शर्माच्या नेतृत्वात एकही सराव सामना खेळावयास मिळाला नाही. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे हा सामना खेळवला गेला नाही.



भारतीय संघाला वर्ल्डकपआधी नाही मिळाली सरावाची संधी


याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला. आता भारतीय संघ थेट विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला खेळवला जाईल. दोन्ही संघ चेन्नईत आमनेसामने असतील. दरम्यान, विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे.



विश्वचषकात या संघांविरुद्ध खेळणार भारत


ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक अभियानाची सुरूवात केल्यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघादरम्यान दुपारी दीड वाजल्यापासून सामन्याला सुरूवात होईल. याशिवाय भारतीय संघ बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. तर या स्पर्धेचा शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून