पणजी : गोव्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खाजगी बसचा भीषण अपघात (Goa Bus accident) झाला आहे. यात चालक जागीच ठार झाला असून इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पणजीहून (Panaji) हैदराबादच्या (Hyderabad) दिशेने निघाली होती. दरम्यान धारबांदोडा येथे या बसला अपघात झाला. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हैदराबादला निघालेली ही बस रस्त्याच्या एका वळणावर आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेत काढले. यावेळेला या बसमध्ये २३ प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन चालक आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत, पैकी ९ जणांची अवस्था गंभीर आहे.
पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये वामशी मुशरी (वय २३), श्वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) आणि शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…