Shivaji Park : शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये सापडली मगर...

कर्मचार्‍यांची उडाली धांदल


मुंबई : मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क (Dadar Shivaji Park) ही अत्यंत गजबजाटीची जागा आहे. अनेक लोक या ठिकाणी दररोज भेट देत असतात. विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण वर्ग येथे चालवले जातात. तसेच लहान मुलांसाठीही अनेक प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा या ठिकाणी आहेत. त्यामुळे दररोजच पालक आणि लहान मुलांची या ठिकाणी गर्दी होत असते. मात्र, या गर्दीच्या ठिकाणी एक धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांचीच धांदल उडाली. शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात (Mahatma Gandhi Swimming pool) तब्बल २ ते ३ फूट लांबीची मगर (Crocodile) आढळून आली. यामुळे कर्मचार्‍यांसोबत सर्वच घाबरले. सध्या मगरीला पकडून तलावाच्या बाहेर काढण्यात आले आहे.


आज सकाळच्या सुमारास तलावाचे इन्स्पेक्शन करत असताना तलावात मगर असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले. त्याने लगेच काही जणांच्या साथीने तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. या दरम्यान मगरीने एका कर्मचार्‍याला काही प्रमाणात जखमीही केलं. बाजूलाच असलेल्या प्राणिसंग्रहालयातून ही मगर आली असावी असा अंदाज कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणिसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. शिवाय दोन महिन्यांपूर्वी याच स्विमिंग पूलमध्ये सापदेखील सापडला होता. त्यामुळे कोणाला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न या ठिकाणी येणार्‍या नागरिकांकडून विचारला जात आहे.


मार्च एलिगेटर (March alligator) या जातकुळीतील ही मगर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तलावात आढळून येणार्‍या मगरींइतकीच ही मगरदेखील घातक असते. शिवाजी पार्कमधील या स्विमिंग पूलमध्ये सकाळच्या सुमारासच लोक पोहण्यासाठी येत असतात. मात्र त्यापूर्वीच ही मगर सापडल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.



मनसेची प्राणिसंग्रहालयावर कारवाईची मागणी


मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले की, स्विमिंग पूलला लागूनच एक अनधिकृत प्राणिसंग्रहालय आहे ज्यात साप, मगर यांसारखे प्राणी अत्यंत दुरावस्थेत ठेवलेले आहेत. ते मोकाट फिरत असतात. त्यामुळे माणसांच्या जीवाला तर धोका आहेच पण त्या मुक्या प्राण्यांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की, झू ऑथोरिटीने यावं आणि हे सगळे प्राणी ताब्यात घ्यावेत आणि त्यांची व्यवस्थित काळजी, निगा घ्यावी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ST Bus Ticket Fare : एसटीचा प्रवास महागला! मुंबई, पुणेसह प्रमुख मार्गांचे नवे तिकीट दर जाहीर

मुंबई : राज्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी (ST)

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल होणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवार १९ जुलै २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि

Central Railway : दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी लाईन पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही रेल्वे सेवांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन / मार्गातील बदल

मुंबई ( प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानचे दक्षिण-पूर्व डाऊन मार्ग आणि मध्य मार्ग

NEET 2026 : बारामतीच्या श्रावणी कुदळेची NEET 2026 मध्ये चमक; महाराष्ट्रात प्रथम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

बारामती : नीट २०२६ (NEET 2026) परीक्षेत बारामतीच्या श्रावणी कृष्णकांत कुदळे (Shravani Kudale) हिने उल्लेखनीय यश मिळवत

Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढ; डिझेल दरवाढीसह वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस

Nitesh Rane : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) विकासाला गती; औद्योगिक व पर्यटन पायाभूत सुविधांवर भर

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या