मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांनी आज मुंबईत फॅशन स्ट्रीटपासून ते मंत्रालयापर्यंत ‘मी पण गांधी’ पदयात्रेला (Mi pan Gandhi) सुरुवात केली. मात्र, या दरम्यान त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी ही अडवणूक केली मात्र इंडिया आघाडीचे नेते याला न जुमानता आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमुळे मंत्रालय परिसरात अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक गाड्या अडून राहिल्या आहेत व ट्राफिक जाम झाले आहे. मेट्रो सिनेमा – फॅशन स्ट्रीट – हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. मात्र जमावबंदीच्या कारणास्तव रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं.
पोलिसांच्या या म्हणण्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या रॅली पुढे नेणारच अशी आक्रमक भूमिका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…