Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी'या' गावात दूध विकल्यास मिळते शिक्षा, ५० वर्षांपासून ठप्प आहे व्यवसाय

‘या’ गावात दूध विकल्यास मिळते शिक्षा, ५० वर्षांपासून ठप्प आहे व्यवसाय

भिंड : दूध हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. ते शरीर सुदृढ ठेवतं, शरिराला ऊर्जा देतं. जन्माला येताच आईचं आणि वाढत्या वयात गायी, म्हशीचं दूध शरिरासाठी अत्यंत मौल्यवान मानलं जातं. त्यामुळे कितीही महागलं तरी लोक दूध खरेदी करणं थांबवत नाहीत. त्यामुळे ज्या घरी गायी, म्हशी असतात त्या घरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सदैव लक्ष्मीचा वास असतो. दुधाचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व असतानाही मध्यप्रदेशात एक असं गाव आहे, जिथे दुधाची जणू नदी वाहते, मात्र कधीच विक्री होत नाही. गावकऱ्यांनी दूध विकण्याचा विचार जरी केला, तरी त्यांना काहीना काही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच येथील लोक दूध नाही, तर दही आणि तूप विक्रीतून उत्तम नफा मिळवतात.

मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कमई गावात जवळपास ३ हजार लोक राहतात. इथे अशी मान्यता आहे की, दूधविक्री केल्यास गावचे देवता हरसुख बाबा शिक्षा देतात. म्हणूनच वाया गेलं तरी चालेल पण दूध विकायला गावकरी घाबरतात. ते असं म्हणतात की, जर कोणी दूध विकण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची म्हैस दूध देणं बंद करते किंवा तिच्या स्तनांमधून दुधाच्या जागी रक्त येऊ लागतं.

कमई गावात दूध न विकण्याची परंपरा मागील ५० वर्षांपासून चालत आली आहे. परंतु या गावात कधीही जा, आपल्याला वेळेला ५० किलो तूप मिळतं. शिवाय बाबांनी शिक्षा करू नये, यासाठी येथील लोक अत्यंत प्रामाणिकपणे तूपविक्री करतात.

त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. त्यामुळे ग्राहकांना साजूक तूप खायला मिळतं. याच कारणामुळे दूरदूरहून ग्राहक या गावात तूप आणि दही खरेदीसाठी येतात.

गावात आहे बाबांचं भव्य मंदिर

कमई गावात हरसुख बाबांचं विशाल मंदिर आहे. मंदिराच्या आसपासच्या गावातील लोकांची त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा आहे. शिवाय त्यांच्याच आशीर्वादाने येथील लोकांकडे भरपूर गायी, म्हशी आहेत ज्या भरपूर दूध देतात आणि त्यामुळे गावकरी सुदृढ आयुष्य जगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -