Nitesh Rane : संजय राऊत लुच्चा आणि लफंगा

कोणाच्याही घरात पाळणा हलला तर ठाकरे गटाचे लोक लगेच पेढे वाटतात


चायनीज मॉडेल शिवसैनिकांनी मित्र मंडळाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा घ्या


नितेश राणे यांची घणाघाती टीका


मुंबई : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळामुळे, शेतकर्‍यांच्या हितासाठी परदेश दौरा रद्द केला तर पेंग्विन ठाकरेला लगेच गुदगुल्या झाल्या की हे माझ्यामुळेच झालं. विधानसभा अध्यक्षांचा नियोजित घाणा दौरा काही कारणास्तव रद्द झाला तर ठाकरे गटाला वाटलं की हे पण आमच्यामुळेच झालं, त्यामुळे आजकाल महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही घरात पाळणा हलला तर ठाकरे गटाचे पेढे वाटायला सुरुवात करतात, त्यांना वाटतं की हे आमचंच आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उबाठावर टीकास्त्र उपसले.


नितेश राणे म्हणाले, आज सकाळी संजय राजाराम राऊतने सामनाच्या अग्रलेखात घाणा या देशाबद्दल वक्तव्य केलं. तुमच्या मालकाने मुख्यमंत्री असताना कोरोनामध्ये निष्काळजीपणा केल्याने जे लाखो मृत्यू महाराष्ट्रात झाले मग त्याच्यात आणि घाणाच्या इतिहासात काहीच फरक नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्‍याबद्दल बोलता मात्र महाविकास आघाडीची सत्ता असताना तुमच्या मालकाचा मुलगा दाओसच्या नावाखाली स्पेनमध्ये फुटबॉल मॅच बघायला गेला होता. त्याच्याबरोबर कोणती महिला अधिकारी त्यावेळी फिरत होती याचीही थोडी माहिती घ्यावी.


पुढे ते म्हणाले, एकीकडे बाळासाहेबांच्या नावावर मोठमोठी भाषणं करता मात्र १७ नोव्हेंबर या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा परदेशातच होता, शिवाय उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये आजारी असतानाही हा बघायला आला नाही. त्यामुळे उगाच दुसर्‍यांवर टीका करण्यापेक्षा तुमच्या मालकाचा मुलगा दाओसच्या नावाने जे धिंगाणे घालत होता त्याविषयी बोला, असं नितेश राणे म्हणाले.



हे चायनीज मॉडेल शिवसैनिक


संजय राऊतला सगळे लुच्चे आणि लफंगे वाटतात, पण स्वतः शिवसैनिक अशी स्वतःची ओळख सांगणारा हा चायनीज मॉडेल शिवसैनिकच सर्वात मोठा लुच्चा आणि लफंगा आहे. दसरा मेळाव्यासाठी ज्या याचिका कोर्टात दाखल झाल्या आहेत त्यांचा विचार करुन कोर्ट योग्य तोच निर्णय घेईल आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा करण्याची परवानगी देईल, त्यामुळे या चायनीज मॉडेल शिवसैनिकांनी एखाद्या मित्र मंडळाच्या नावाखाली छोटासा हॉल बुक करावा आणि तिथे आपला दसरा मेळावा घ्यावा, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता