World Cup 2023: प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार पाकिस्तान -न्यूझीलंड सामना

Share

नवी दिल्ली: भारतात या वर्षी ५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप २०२३(world cup 2023) सुरू होणार आहे आणि फायनल सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २९ सप्टेंबरला होणारा वर्ल्डकप २०२३चा वार्मअप सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने केलेले हे विधान आश्चर्यचकित करणार आहे.

प्रेक्षकांशिवाय पाहिला जाणार पाकिस्तान-न्यूझीलंड सामना

हैदराबाद पोलिसांनी २९ सप्टेंबरला वर्ल्डकपच्या वॉर्म अप सामन्यातील हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याबाबत असमर्थतता जाहीर केली. या सामन्याच्या आधी हैदराबादमध्ये गणेश विसर्जन आणि मिलाद उन नबी हे सण आहेत. याच कारणामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी मिळणार नाही. बीसीसीआयने याबाबत मोठे अपडेट दिले आहेत.

५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरूवात

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप ५ ऑक्टोबर २०२३ पासून १९ नोव्हेंबरपर्यंत भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. स्पर्धेत १० संघ भाग घेणार आहेत. एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक ५ वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. याशिवाय भारत आणि वेस्ट इंडिज २-२ वेळा आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

२०२३च्या वर्ल्डकपची सुरूवात माजी विजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर २०२३ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या सामन्याची वेळ सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी २ वाजता खेळवले जाणार आहेत.

Recent Posts

मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…

2 hours ago

ईडीची टांगती तलवार…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…

2 hours ago

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…

3 hours ago

साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…

4 hours ago

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…

5 hours ago

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…

5 hours ago