वायनाड : बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय-PFI) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी केरळमधील वायनाड, कोझिकोड आणि कोची येथे १२ ठिकाणी छापा मारला. संघटनेच्या आवारात आणि त्यांच्या माजी नेत्यांसह इतरांचीही झडती घेण्यात आली.
कथित बेकायदेशीर कारवायांसाठी केंद्राने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीएफआय (Popular Front of India) संघटनेवर बंदी घातली असून त्यावेळी पीएफआयच्या अनेक नेत्यांना अटक केली होती.