IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी विजय

इंदौर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने(india vs australia) डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात शुभमन गिल तसेच श्रेयस अय्यरने जबरदस्त शतके ठोकली. तर सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद खेळी केली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.


भारताचे रवीचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी घेतलेले प्रत्येकी ३ विकेट तसेच प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.


भारताने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत नवा रेकॉर्ड निर्माण केला. शुभमन गिलने १०४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ७२ धावा तडकावल्या.


भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी वर्ल्डकपमध्ये होईल.

Comments
Add Comment

World Athletics Championship: कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रालाही टाकले मागे

सचिन यादवची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये चमकदार कामगिरी! नवी दिल्ली: भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत