घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा काहींच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जात असतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येते. आपण जाणुन घेऊयात की आपल्या लाडक्या गणेशाचं विसर्जन का करण्यात येते.
काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, गणेशजींनी सलग १० दिवस महाभारत लिहिले होते. एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते. हे ज्यावेळी व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेद व्यासजींनी त्यांना एका जलस्त्रोतावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले. त्यामुळे गणेशजींना मोठा आराम मिळाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. त्या दिवसापासून या तिथीला गणेशजींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.
पाण्यात का केलं जात विसर्जन? ज्ञान, बुद्धीची देवता, आणि पाणी, हे देखील ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित असल्याचे मानले जाते, याचे कारण स्वतः गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात. पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेले असल्यामुळे, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली गणेशाची मूर्ती मूळ स्वरूपात पाच तत्वांमध्ये विरघळते आणि विलीन होते.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…