Ganesh Chaturthi 2023 : खोटं सांगून गणपतीसाठी गावी गेला आणि...

  118

मुंबई : आजारी असल्याचे कारण देत सुट्टी घेऊन कोकणात गणपतीसाठी (Ganesh Chaturthi 2023) गेलेल्या पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर लोहमार्ग मुख्यालयात असलेल्या राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी गणपतीला गावी कणकवलीला जाण्यासाठी रजा मागितली होती. परंतू रजा नामंजूर करण्यात आली होती.


गणेशोत्सव सुरू असल्याने राज्यभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्यभरातून भाविक येत असतात. अशातच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मुंबईत गणेशोत्सवानिमित्त संवेदनशील बंदोबस्त असल्याने सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सूट्टी वगळता सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.


रजा रद्द करण्यात आल्यामुळे १४ तारखेला राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी आजारी असल्याचे कारण देत सुट्टी घेतली. यानंतर, ते आजारी आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्यांच्या ठाकुर्ली येथील घरी पोलीस कर्मचारी पाठवला असता संजय सावंत गावी गेल्याचे समजताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पोलीस निरीक्षक संजय सावंत यांस निलंबित केले आहे.


Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन