Mumbai Trans Harbour Link : ९६.६० टक्के प्रगतीसह मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प प्रगतीपथावर!

सुरक्षित प्रवास निश्चित करण्याच्या दृष्टीने पूर्णत्वाकडे असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी केली पाहणी

एमटीएचएलवर अत्याधुनिक विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी सुरू


मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणा-या सुमारे २२ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से. यांनी केली.


डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा बारकाईने आढावा घेतला आणि प्रकल्पातील उर्वरित कामे गुणवत्तेसह झपाट्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


सद्यस्थितीत प्रकल्पाचे ९६.६० टक्के कामे पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पात एकूण १२१२ विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी केली जाणार असून त्यातील २० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीव्दारे (Central Control & Monitoring System ) नियंत्रित केले जातील. हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्यादृष्टीने निर्माण होणा-या आव्हानावर मात करतील अशा पद्धतीने निर्माण कऱण्यात आले आहे. विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वा-याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या खांबांना वीज अवरोधक यंत्रणा बसवण्याची सोय करण्यात आली आहे.


बांधकामासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन


एमटीएचएल प्रकल्पाची व्याप्ती पाहता, हा प्रकल्प एकूण ४ पॅकेज मध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये ३ पॅकेज हे स्थापत्य कामांकरीता असून चौथा पॅकेज हा इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (intelligent transport system), स्वयंचलित टोल कलेक्शन यंत्रणा आणि विद्युत कामांकरीता असल्याने तो इतर पॅकज प्रमाणेच विशेष महत्त्वाचा आहे. एमटीएचल हा प्रकल्प सुमारे ६५ ते १८० मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे.


मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांसोबत जलद जोडणी


एमटीएचएल प्रकल्प हा नवी मुंबई सह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद जोडणी प्रदान करण्याची क्षमता राखणारा आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीन विकासासाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.


प्रकल्पातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. म्हणाले, "मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग आहे. हा केवळ कनेक्टिव्हिटी सुधारणारा प्रकल्प नसून प्रदेशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सुरू असलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा मला आनंद होत आहे आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात सहभागी सर्वांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून ते योग्यरीतीने सुरू आहे."


एमएमआरडीए एमटीएचएल प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आणि मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक नेटवर्कमध्ये त्याचे यशस्वी एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी