संतोष रांजणकर
मुरूड : शासनाच्या बांधकाम विभागातर्फे साळाव-मुरुड रस्त्यावरील बोर्ली-नाका रस्त्यावरील काँक्रिटीकरण कामाची मे २०२३च्या पहिल्या आठवड्यातील वर्क ऑर्डर असताना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कामाला सुरुवात करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह बाप्पालाही अखेर ठेकेदाराच्या तसेच बांधकाम खात्याच्या नियोजनशून्य कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चेतन जावसेन यांनी केली आहे.
मुरुड तालुक्यातील बोर्ली नाका ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत गणेशोत्सवात लाखोंची उलाढाल होत असते. मागील दोन वर्षापूर्वी आलेल्या पुरामुळे येथील व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून सावरत असताना यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच बोर्ली नाका रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले. सदर कामाची मागणी ही माझ्या सरपंचपदाच्या कालावधीत जेव्हा बोर्ली नाका येथे पूर आला असता माजी आमदार पंडित पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून बोर्ली नाका येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या कामासाठी तत्कालीन सहाय्यक अभियंता महेश नंदेश्वर यांचेदेखील सहकार्य लाभले होते. सत्ताधारी पक्षाला याची कुणकुण लागल्यावर यात अपरिपक्व राजकारणाला पेव फुटले. रस्त्यासाठी आंदोलनाचा फार्स झाला तर खड्डेमय, खराब रस्त्याचे खापर सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीवर फोडण्यात आले अन् आंदोलनानंतर दोन दिवसांत सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी या रस्त्याच्या काँक्रिटिकरण कामाचा नारळ फोडतात. हे पाहता, हा सर्व खटाटोप केवळ फक्त आणि फक्त श्रेय लाटण्यासाठी तर नाही ना? याची चर्चा मुरब्बी राजकारणी करीत असल्याचे चेतन जावसेन यांनी सांगितले.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…