मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या.
या खेळाडूवर घरगुती हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या खेळाडूला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या खेळाडूच्या पत्नीने केलेल्या हिंसाचार आरोप प्रकरणात जामीन दिला आहे.
वनडे वर्ल्डकपआधी भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाताच्या न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणात त्याला जामीन मंजूर केला आहे. शमीचा मोठा भाऊ मोहम्मद हसीबला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मार्च २०१८मध्ये मोहम्मद शमीच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले होते. आपल्या तक्रारीत तिने शमीवर शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात शमी आणि त्याचा मोठा भाऊ यांची चौकशी केली होती आणि दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता.
ो
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…