एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

  139

पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये 'श्रीं' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.


हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.


वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ - संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने