नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट षरिषदेने(icc) यूएईमध्ये २०२१मध्ये खेळवण्यात आलेल्या अमिरात टी१० लीगमधील मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आयसीसीकडून ३ भारतीयांसह ८ जणांवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला आहे. आयसीसीकडून समोर आलेल्या यादीत ज्या भारतीयांच्या नावाचा समावेश आहे त्यातील दोन लोक संघाचे मालक आहेत. याशिवाय या यादीत बांगलादेशचा माजी क्रिकेटर नासिर हुसैनचेही नाव आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात सामील भारतीयांमध्ये या लीगमध्ये खेळणारी पुणे डेविल्सचे पराग संघवी आणि कृष्ण कुमार आहेत. हे दोघेही संघाचे सहमालक आहेत. याशिवाय तिसरे भारतीय म्हणून सन्नी ढिल्लो आहेत जे फलंदाजी कोच आहेत.
आयसीसीने या सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप लगावण्यासोबतच २०२१मध्ये अबुधाबी टी-१० लीह आणि त्या स्पर्धेतील सामन्यात फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या विधानात संघवी यांच्यावर सामन्याचे निकाल आणि अन्य गोष्टींवर सट्टा लावण्यासोबतच तपासादरम्यान एजन्सीला सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. तर फलंदाजी कोच सनी ढिल्लोवर मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. तर कृष्ण कुमारवर DACOपासून तथ्य लपवल्याचा आरोप केला आहे.
या यादीत बांगलादेशचा माजी क्रिकेटर नासिर हुसैनवर DACOला ७५० डॉलरपेक्षा अधिक रूपयांचे गिफ्ट मिळाल्याची माहिती न दिल्याचा आरोप आहे. याशिवाय या यादीत सामील अन्य लोकांमध्ये फलंदाजी कोच अजहर जैदी, मॅनेजर शादाब अहमद आणि यूएईचे खेळाडू रिजवान जावेद आणि सालिया समन आहेत. आयसीसीने ६ लोकांवर निलंबिनाची कारवाई करण्यासोबतच आरोपांचे उत्तर देण्यासाठी १९ दिवसांची मुदत दिली आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…