जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखणार!

आपण विकसित भारत ते विकसनशील भारत या प्रवासाला निघालो


आता मोठी स्वप्ने पाहून आपण जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास


नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात आजपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु झाले आहे. परंतु जुन्या संसद भवनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आतापासून जुन्या संसदेच्या वास्तूला 'संविधान सदन' म्हणून ओळखले जाणार आहे. भारत नव्या ऊर्जेने पुढे सरसावतोय. मी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितले होते हीच योग्य वेळ आहे. देश ज्या दिशेने वाटचाल करत आहे त्यानुसार अपेक्षित परिणाम मिळणार आहेत. आपण जितक्या वेगाने काम करू तितक्या वेगाने आपली प्रगती होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यावेळी म्हणाले.


सेंट्रल हॉलला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, अनेक महिला, तृतीयपंथीयांना या संसदेत न्याय मिळाला आहे. या संसदेने कलम ३७० हटवले. सेंट्रल हॉल आमच्या भावनांनी भरलेला आहे. या संसदेत ४१०० हून अधिक कायदे मंजूर झाले. जम्मू-काश्मीर आता विकास आणि शांततेच्या मार्गावर आहे. आता आम्ही नवीन संसद भवनात एका नवीन भविष्याचे उद्घाटन करणार आहे.





मोदी म्हणाले, 1952 नंतर जगभरातील सुमारे 41 राष्ट्रप्रमुखांनी सेंट्रल हॉलमध्ये येऊन आपल्या खासदारांना संबोधित केले. येथेच 1947 मध्ये ब्रिटिश सरकारने सत्ता हस्तांतरित केली. हा सेंट्रल हॉलही त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. याच दिवशी आपण आपले राष्ट्रगीत आणि तिरंगा स्विकारला होता. आता आपण विकसित भारत ते विकसनशील भारत या प्रवासाला निघालो आहोत. आता छोटी स्वप्ने पुरणार ​​नाहीत. मोठी स्वप्ने पाहून आपण जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतो. आपण सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत. सर्वात मोठ्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक तरुणांची ही पहिलीच वेळ आहे.


ते पुढे म्हणाले, राजकीय फायद्यासाठी आम्ही कठोर निर्णय पुढे ढकलू शकत नाही. ते घ्यावेच लागतील. भारताला आता थांबायचे नाही, नवीन ध्येये ठेवायची आहेत. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतातील तरुणांचा कल विज्ञानाकडे वाढत आहे आणि आता आपण ही संधी घालवायची नाही.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात