Monday, July 8, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and Riddles : अभ्यास आपण करू कविता आणि काव्यकोडी

Poems and Riddles : अभ्यास आपण करू कविता आणि काव्यकोडी

चिंता नका करू, आळस नका धरू
आनंदाने उत्साहाने, अभ्यास आपण करू

माय मराठीचा, अभिमान फार
इंग्रजी हा आपला, आहे जोडीदार

कवितेचा आशय, सांगू आणि वाचू
ओळी गुणगुणताना, फेर धरून नाचू

गणिताच्या तासाची, नको आता भीती
आकडेमोड करताना, लक्षात ठेव रिती

विज्ञानाचा तास, शिकायचा खास
प्रयोगाच्या कृतीत, सारे होऊ पास

भूगोलात गोल गोल, पृथ्वी अनमोल
पर्यावरण शिकूनी, साधू समतोल

इतिहासाची पाने, सांगती कहाणी
देशासाठी लढणारे, वीर वीरांगणी

आवडीने शिकूया, आपण सारे विषय
आता नको अभ्यासाचे, काडी इतके भय

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१)धारदार नखे
बळकट सुळे
मानेवर त्याच्या
आयाळ रूळे

रुबाबात फिरताना
दिसतो कसा पाहा
जंगलचा राजा
कोण बरं हा?

२) कडूला नेहमीच
नाक मुरडते
तिखट लागताच
जाम ओरडते

साऱ्या चवी
तिलाच कळतात
कुणाचे चोचले
पुरविले जातात?

३) एका पायावर
फिरतो कसा
भिंगरीचा तो
भाऊ जसा

हळूच येईल
तळहातावर
तडतड फिरे
कोण जमिनीवर?

उत्तरे : 

१) सिंह

२) जीभ

३) भोवरा 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -