केरळ : कोरोना महामारीमधून सावरत असतानाच आता केरळमध्ये निपाह व्हायरसच्या (Nipah Virus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निपाह व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केरळसह तामिळनाडू, कर्नाटकने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केला आहे.
केरळमध्ये निपाह व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता, तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना केरळच्या ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे.
केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो.
मलेशियातील सुंगाई निपाह या गावात १९९९ मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. त्याचबरोबर डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील हा विषाणू पसरू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर तो इतरांनाही संक्रमित करू शकतो. निपाह व्हायरस कमी संसर्गजन्य परंतु अधिक प्राणघातक मानला जातो. याचा अर्थ असा की कमी लोकांना याची लागण होऊ शकते, परंतु मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये जेव्हा निपाह विषाणूचा प्रसार झाला तेव्हा त्याचा मृत्यूदर ४५ ते ७० टक्के होता.
एवढेच नाही तर निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत निपाह बाधित व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसतात.
त्याच वेळी, परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती २४ ते ४८ तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते, इतका हा आजार गंभीर आहे. यामुळे केरळसह शेजारील राज्यांनी अलर्ट जारी केला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…