Lift collapsed in Noida : नोएडात मोठी दुर्घटना! इमारतीच्या बांधकामादरम्यान लिफ्ट कोसळून चार जणांचा मृत्यू

Share

चार दिवसांपूर्वी ठाण्यातही घडली होती अशीच घटना

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. आम्रपाली ग्रुपकडून येथे निर्माण होत असलेल्या एका बिल्डींगमधील लिफ्ट कोसळून (Lift collapsed) अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. लिफ्टमधील मृतांचे शव बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिसरख पोलीस ठाणे हद्दीतील ड्रीम व्हॅली परिसरात ही इमारत उभारली जात आहे. दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामासाठीचे साहित्य आणि कामगार होते. लिफ्ट दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते.

ठाणे जिल्ह्यातही चार दिवसांपूर्वी सोमवारी लिफ्ट दुर्घटनेत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली होती. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना अपघात घडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नोएडात लिफ्ट दुर्घटनेमुळे कामगारांना आपला जीव गमवावा लागल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago