Tuesday, July 1, 2025

Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नवी दिल्ली : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. यावेळेस शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. टेक दिग्गज कंपनीने ग्लोबल रिक्युमेंट टीममधून कर्मचाऱ्यांना काढसे आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काही शेकडो पदे समाप्त करण्याचा निर्णय व्यापक प्रमाणात घेतलेल्या कपातीचा भाग नाही आणि महत्त्वाच्या भूमिकांसाठी टीमची संख्या कायम ठेवली जाईल.


नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची कपात करणारी ही पहिली बिग टेक कंपनी आहे. विशेष म्हणजे २०२३ वर्षाच्या सुरूवातीला मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या संख्येने नोकरीत कपात केली होती.



अल्फाबेटने आधीही केली आहे कपात


गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जानेवारीमध्ये भरती आणि इंजीनियरिंग सह टीममध्ये साधारण १२ हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली होती. कर्मचाऱ्यांची ही कपात जगभरात करण्यात आली होती. हा आकडा एकूण वर्कफोर्सच्या ६ टक्के इतका आहे. अॅमेझॉनकडून १८ हजार नोकरी कपातीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर काही आठवड्याने मायक्रोसॉफ्टनेही १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.



चार पटीने कपात वाढली


अमेरिकासह जागतिक स्तरावर कपातीचे सत्र कायम आहे. दिग्गज कंपन्यांसह स्टार्टअप्सनेही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Comments
Add Comment