Gajanan Maharaj : महाराजांवर खटला (भाग २)

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

जठार कारकुनाला म्हणाले, “गजानन महाराजांना बोलवा.” त्यांची आज्ञा ऐकून कारकुनाने एक शिपायास महाराजांना आणावयास पाठविले. तो शिपाई महाराजांना म्हणाला, “कचेरीत चला. अधिकाऱ्याने तुम्हाला बोलावून आणण्यास मला सांगितले आहे. बऱ्या बोलाने चला. नाहीतर मला तुम्हाला हात धरून न्यावे लागेल. त्या शिपायाला महाराज म्हणाले, “ये तुझे शिपाई पण पाहतो.” असे म्हणून महाराजांनी त्याचा हात घट्ट धरला. ती त्याच्याने सोडवेना. त्या घट्ट धरण्यामुळे रक्तप्रवाह बंद झाला. त्याच्या हाताला कळ लागली व तो व्याकूळ होऊन तळमळू लागला.

शिपायाला येण्यास वेळ झाला म्हणून वकिलाला म्हणजेच व्यंकटराव देसाई यांना पाठविले. जठार त्यांना म्हणाले, “तुम्ही जाऊन समर्थांना घेऊन यावे.” तोपर्यंत कचेरीत महाराजांनी शिपायाचा हात धरला असून त्याला एका ठिकाणी बसवून ठेवले आहे, असे वृत्त कळले होते. मग देसाई त्या ठिकाणी आले आणि भक्तांना बोलले, “समर्थांना कचेरीत नेण्यापूर्वी त्यांना धोतर नेसविले पाहिजे. महाराजांना धोतर नेसविण्यात आले. महाराजांनी ते रस्त्यातच सोडून टाकले आणि नग्न अवस्थेतच कचेरीत गेले. कचेरीत महाराजांसोबत भास्कर हा शिष्य होता. जठार यांनी महाराज आल्याचे पाहताच त्यांना बसण्याकरिता खुर्ची दिली. महाराजांना म्हणाले, “महाराज इथे बसा. तुम्ही नेहमी गावात नागवे का फिरता? हे बरे नाही. नागवे फिरणे हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून आपणास विनंती की, हे नागवे राहणे सोडून द्या.” असे जठारांचे भाषण ऐकून महाराज सौम्यपणे हसले आणि उत्तरले :

तुला काय करणे यासी।
चिलीम भरावी वेगेसी।
उगीच नसत्या गोश्टिंसी।
महत्त्व नर यावे निरर्थक॥७०॥

महाराजांचे या प्रकारचे बोलणे ऐकून जठार विरघळून गेले. त्यांच्या हे लक्षात आले की, महाराज हे विदेही संत आहेत. यांना जनरीतीचे मुळीच भान नाही. हे भगवतमधील वृषभदेव, शुक्राचार्य अथवा वामदेवाचा दुसरा अवतार असावे. असे संत नेहमी नीज आनंदामध्ये रत असतात. त्यांच्यात गुन्हा लावू नये.

ज्याप्रमाणे अग्निहोत्र्यांना अग्नी हा अग्निकुंडात ठेवणे भाग असते तसेच यांचे नागवेपण अग्निसमान आहे. त्यामुळे त्यांना वस्त्रारूपी कुंडात ठेवणे हे यांच्या शिष्यांचे काम आहे. ते त्यांनी केले नाही म्हणून याविषयी यांचा शिष्यगण अपराधी आहे. त्यांनी हुकूम फर्माविला, “महाराज हे मूळचे जीवनमुक्त आहेत. त्यांना व्यवस्थित ठेवणे हे भास्कर शिष्याचे काम होते. ते त्यांनी केले नाही म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला आहे.”

असा खटल्याचा निकाल झाल्यावर महाराज भास्कराला म्हणाले, “यापुढे असा आग्रह करशील का स्वतःची फजिती करून घ्यायला?” यावर भास्कर काहीच बोलला नाही, मौन राहीला. पुढे मंडळींनी विचार केला की, महाराजांना यापुढे अग्निरथात बसवू नये. भक्त श्री महाराजांना बैलगाडीत बसवून नेऊ लागले. हा क्रम पुढे अनेक दिवस असाच सुरू होता.

महाराजांवर खटला भरला आहे, हे ऐकून खिन्न झालेल्या व्यंकटराव देसाईं भक्ताने पाहा किती तळमळीने नी आर्ततेने जठारांना विनंती केली. हीच खरी गुरूविषयीची तळमळ, निष्ठा आणि प्रेम.

क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago