CM Shinde : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

  169

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार गंभीर आहे, असे सांगून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारंवार केली. मात्र मागील दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओवर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वर चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.


मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.


आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून हे जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे शिंदे यांनी म्हटले.


आपण बोलून मोकळं व्हायचं, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत. हे कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.



असा झाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका संवाद


एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.


अजित पवार – हो… येस.


देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)