मुंबई : आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३ (ICC Men’s World Cup 2023) ची प्रतिष्ठीत ट्रॉफी आणि क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठित बक्षिसांचे पोदार एज्युकेशन नेटवर्ककडून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सन्मान केला. शाळेच्या बँडने विश्वचषक ट्रॉफीचे स्वागत केले. यावेळी ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना प्राध्यापकांसह क्रिकेटचा वैभव पहाण्याची ऐतिहासिक ट्रॉफीच्या माध्यमातून संधी मिळाली. ट्रॉफीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भारताने २०११ मध्ये जिंकलेली ही मूळ टूर्नामेंट एडिशन ट्रॉफी आहे.
या महत्त्वाच्या भेटीदरम्यान, ट्रॉफीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आणि स्पर्धेसाठी यजमानपद भारताला मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व नृत्य आणि गाणी सादर केली.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, मुंबईच्या मुख्याध्यापिका वंदना लुल्ला यांनी उत्साह आणि कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह दिसतो, तो प्रत्येक भारतीयाला क्रिकेटबद्दल काय वाटते याची फक्त एक झलक आहे. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर भावना आहे. पोदार एज्युकेशन नेटवर्कसाठी सर्वात प्रतिष्ठित आयसीसी पुरुष विश्वचषक २०२३ ट्रॉफीचे स्वागत आणि यजमानपद आणि या संस्मरणीय दौऱ्याचा एक भाग बनणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. विश्वचषक ट्रॉफी टूरद्वारे क्रिकेट आणि मुलांना जोडण्याचा हा एक अतिशय सुनियोजित आणि विचारपूर्वक उपक्रम आहे ज्याद्वारे युवा पिढीला क्रिकेटच्या इतिहासाचा एक भाग बनवता येईल आणि त्यांना क्रिकेटच्या जगाच्या जवळ आणता येईल.”
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिष्ठित आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत तयारी करत असताना, पोदार एज्युकेशन नेटवर्कने ट्रॉफी टूरचा एक भाग म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल, मुंबई येथे आयसीसी विश्वचषक ट्रॉफी २०२३ अभिमानाने आणली आहे.
या उपक्रमाचा उद्देश आयसीसी विश्वचषक ट्रॉफी २०२३ भारतातील विविध ठिकाणी प्रदर्शित करणे, आगामी स्पर्धेसाठी उत्साह आणि समर्थन वाढवणे आहे. ट्रॉफी दौर्यामुळे १० लाख चाहत्यांना ट्रॉफीसोबत वैयक्तिक संवाद साधण्याची संधी मिळेल. ऐतिहासिक महत्त्वाच्या खुणा, क्रिकेट अकादमी आणि शैक्षणिक संस्था येथे थांबून, सर्व स्तरातील चाहत्यांना क्रिकेटचे वैभव जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देत, एका जलद प्रवासाला सुरुवात केली. कुवेत, बहरीन, मलेशिया, यूएसए, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि यजमान देश भारत यासह जगातील १८ देशांमध्ये ही ट्रॉफी फिरणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…