Supreme Court lawyer : सर्वोच्च न्यायालयाच्या वकील महिलेची पतीकडून हत्या

  115

हत्या केली आणि स्टोअर रुममध्येच लपून बसला...


नोएडा : देशात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातही आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या वकील महिलेची हत्या झाल्याने देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या ६१ वर्षीय वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह काल रविवारी संध्याकाळी रक्ताळलेल्या अवस्थेत उत्तरप्रदेशच्या नोएडामधील त्यांच्याच बंगल्याच्या बाथरूममध्ये आढळला. या प्रकरणी २४ तास आपल्याच बंगल्याच्या स्टोअर रुममध्ये लपून बसलेल्या सिन्हा यांच्या पतीला रात्री ३ वाजता पोलिसांनी बाहेर काढले आणि अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.


पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. काल घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रेणूचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तिच्या मृत्यूसाठी कुटुंबियांनी रेणूच्या पतीला जबाबदार धरले आहे. पोलिस पथकाने लोकांचे जबाब घेतले असून घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. शिवाय स्टोअर रुममध्ये लपून बसलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


रेणू सिन्हा आणि त्यांचा पती नितीन सिन्हा यांच्यात घरावरुन वाद असल्याचे समजत आहे. नितीन सिन्हा यांना राहता बंगला विकून परदेशात जायचं होतं तर रेणू यांचा मात्र बंगला विकण्याला विरोध होता. यामुळेच नितीनने त्यांना वाटेतून दूर केले असल्याची शक्यता आहे. रेणू सिन्हा यांची हत्या करण्याआधी नितीनने ब्रिटिश पासपोर्ट तयार केला होता, शिवाय हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारीही केली होती. पोलीस जेव्हा बंगल्यावर पोहोचले तोपर्यंत नितीनने बरेच पुरावेही मिटवले होते. मात्र सगळे पुरावे मिटवण्याआधीच पोलीस तिथे पोहचले. पहाटे तीनच्या सुमारास नितीनला अटक करण्यात आल्यानंतर त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली.



काय आहे घटनाक्रम?


सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या रेणू सिन्हा या पाटण्याच्या होत्या. त्या पतीसह नोएडातील सेक्टर ३० मध्ये राहात होत्या. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तसंच त्यांना कर्करोगानेही ग्रासलं होतं. दोन दिवसांपासून रेणू यांचा भाऊ त्यांना फोन करत होता, मात्र रेणू फोन उचलत नव्हत्या, त्यामुळे रेणू सिन्हा यांच्या भावाने पोलिसांना याबाबत तक्रार केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर पथकाने आत जाऊन तपासणी केली असता घराच्या बाथरूममध्ये रेणूचा मृतदेह पडलेला आढळून आला. रेणूच्या कानाजवळ जखमेच्या खुणा होत्या.


पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला मात्र सीसीटीव्हीचा डिव्हीआर गायब होता. पोलिसांनी रेणू यांच्या पतीला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे नितीन सिन्हानेच त्यांच्या पत्नीला म्हणजेच रेणू यांना ठार केलं असावं असा संशय बळावला. पोलिसांनी बराच शोध घेतला, आसपासच्या भागात असलेले सीसीटीव्हीही तपासले पण त्यांना नितीन कुठेच दिसला नाही. तो घरातच लपला आहे का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी घरही धुंडाळलं. अखेर तो घराच्या स्टोअर रुममध्ये सापडला. त्याला पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास अटक केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी