G20 Summit 2023 : जी-२० परिषदेचा समारोप; नोव्हेंबर अखेरीस होणार व्हर्च्युअल सत्र

  106

ब्राझीलकडे पुढील अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द


नवी दिल्ली : भारताकडे अध्यक्षपदाची जबबादारी असलेल्या भव्य जी-२० परिषदेचा (G20 Summit 2023) आज समारोप झाला. या परिषदेसाठी दिल्ली येथे जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती तसेच जवळपास १,००० विदेशी पाहुणे सहभागी झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या परिषदेचा समारोप करताना 'एक भविष्य' (One Future) या विषयावर चर्चा केली आणि समारोपाची घोषणा केली. यावेळेस पंतप्रधानांनी जागतिक शांततेचा संदेश दिला आणि १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार मानले.


समारोपाची घोषणा करताना पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी सर्व नेत्यांना पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून भेटण्याचे आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की, नोव्हेंबरपर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसात तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी इथे मांडल्या, सूचना दिल्या, अनेक प्रस्ताव आले. त्या प्रस्तावांना गती कशी मिळेल, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबरच्या शेवटी जी-२० चे आणखी एक व्हर्च्युअल सत्र आयोजित करू आणि त्या सत्रात या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ.'



समारोपाची घोषणा


परिषदेच्या शेवटी पंतप्रधानांनी जी-२०चे पुढील वर्षाचे अध्यक्षपद सांभाळणार्‍या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे पुढील सुत्रे सुपूर्द केली. ‘युअर हायनेस, एक्सीलेंस यासोबतच मी जी-२० शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा करतो. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा आनंददायी असावं. स्वस्ति अस्तु विश्वस्य म्हणजे संपूर्ण जगात आशा आणि शांती असावी. १४० कोटी भारतीयांकडून शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार,' असा संदेश मोदींनी यावेळी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा, परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात

लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

देशाच्या करप्रणालीत अद्ययावत, सुलभता येणार नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप

Air India: १ सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन उड्डाण सेवा बंद होणार! एअर इंडियाने केले जाहीर

नवी दिल्ली : एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की ते १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली-वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट उड्डाण

Donald Trump : "ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! अमेरिकन अर्थव्यवस्थेला थेट फटका" ट्रम्पच्या निर्णयाने कंपन्यांची घबराट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर

सीबीएसईची नववीची परीक्षा आता ‘ओपन बुक’ पद्धतीने

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची पद्धत बदलण्याचा