Air hostess case : मुंबई एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

लॉकअपमध्येच लावून घेतला गळफास


मुंबई : मुंबईतील (Mumbai) पवई भागातील मरोळ येथे भाड्याने एका फ्लॅटमध्ये आपल्या मित्रांसमवेत राहणार्‍या रुपल ओगरे (Rupal Ogrey) या २३ वर्षीय एअर हॉस्टेसची (Air Hostess) हत्या झाल्याची बातमी सोमवारी समोर आली होती. या हत्येप्रकरणी इमारतीच्या एका सफाई कर्मचार्‍याला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपीसंदर्भात एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आरोपी विक्रम आटवालने अंधेरी येथे लॉकअपमध्ये (Andheri Police station) असतानाच पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या (Suicide) केली आहे.


आरोपी विक्रम याला रुपलच्या हत्या प्रकरणात अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला ८ सप्टेंबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच विक्रमने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला साडेसातच्या सुमारास रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रमने त्याच्या अंगावरील पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावला. विक्रमने आत्महत्या का केली असावी, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण एअर होस्टेसवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. मात्र अटकेनंतर त्याने पोलिसांना बरीच उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर आज अंधेरी पोलीस स्टेशनमध्येच त्याने आपलं जीवन संपवलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता