मुंबई : मुंबईतील (Mumbai) पवई भागातील मरोळ येथे भाड्याने एका फ्लॅटमध्ये आपल्या मित्रांसमवेत राहणार्या रुपल ओगरे (Rupal Ogrey) या २३ वर्षीय एअर हॉस्टेसची (Air Hostess) हत्या झाल्याची बातमी सोमवारी समोर आली होती. या हत्येप्रकरणी इमारतीच्या एका सफाई कर्मचार्याला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपीसंदर्भात एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आरोपी विक्रम आटवालने अंधेरी येथे लॉकअपमध्ये (Andheri Police station) असतानाच पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या (Suicide) केली आहे.
आरोपी विक्रम याला रुपलच्या हत्या प्रकरणात अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला ८ सप्टेंबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच विक्रमने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला साडेसातच्या सुमारास रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रमने त्याच्या अंगावरील पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावला. विक्रमने आत्महत्या का केली असावी, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण एअर होस्टेसवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. मात्र अटकेनंतर त्याने पोलिसांना बरीच उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर आज अंधेरी पोलीस स्टेशनमध्येच त्याने आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…