मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज परिसरात पावसाने चांगली बॅटिंग केली.
मुसळधार पाऊस असल्यामुळे अंधेरी सबवे खाली पाणी भरले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पुढील तीन दिवस राज्यात पावासाची शक्यता वर्तवली आहे. मागील २४ तासात मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे. तानसा १०० टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले. तसेच मध्य वैतरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मोडकसागर देखील आज किंवा उद्यामध्ये १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.