Dahi handi : दहीहंडीवर पावसाची बरसात

राज्यभरातही पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा


मुंबई : कृष्णजन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) आज मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी (Dahi handi) उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मोकळ्या मैदानावर या दिवशी वेगवेगळ्या मंडळांकडून, पक्षांकडून दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाही या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आल्या असून त्याला पावसानेही सकाळपासूनच हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने आज सकाळपासून मुंबईत चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आता गोविंदांना रणरणत्या उन्हात दहीहंडीचे थर लावावे लागणार नाहीत.


पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.



ठाण्यातील मानाची हंडी


ठाण्यातील (Thane) मानाची हंडी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरु केली होती. आज मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत गोविंदा पथकं या मानाच्या हंडीसाठी ठाण्यात दाखल झाली आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत. याठिकाणी गोविंदांच्या दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.



काल रात्रीपासूनच दहीहंडीचा उत्साह


श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद घेतला. मुंबईतील दादर, नायगाव, वरळी, लोअर परळ आणि मुंबईतील सर्वच परिसरात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. आजही मुंबई ठाण्यासह ठिकठिकाणी थरांचा थरार पाहायला मिळेल.'



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे