Zika Virus: मुंबईकरांनो सावध व्हा! झिकाचा दुसरा रुग्ण आढळला

मुंबई : मुंबईत झिका विषाणूचा (zika virus) दुसरा रुग्ण आढळल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून मंगळवारी याबाबतची माहिती देण्यात आली.


मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या १५ वर्षाच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिला बाकीही दीर्घकालीन आजार आहेत. याआधी चेंबूर परिसरात झिका विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. मुंबईतच दुसरा रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता अधिकच वाढली आहे.


याआधी चेंबूरमध्ये ७९ वर्षी वृ्द्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाली होती. २३ ऑगस्टला मुंबई महापालिकेने याबाबतची माहिती दिली होती. चेंबूरमधील या वृद्ध व्यक्तीला १९ जुलैला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली होती. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. २ ऑगस्टनंतर त्यांना बरे वाटल्यानंतर घरी सोडले गेले.



कसा आहे हा आजार


हा आजार झिका विषाणूमुळे पसरतो. हा सौम्य आजार आहे. संक्रमित झालेल्या एडिस डासांमुळे हा आजार पसरतो. मात्र कोरोनाइतका वेगाने हा पसरत नाही. या विषाणूची लागण झालेल्यांमधील ८० टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे नसतात. मात्र ज्यांना इतर कोणते आजार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात संक्रमित होण्याची भीती असते. झिका विषाणूसाठी कोणत्याही प्रकारची लस सध्या उपलब्ध नाही.

Comments
Add Comment

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून