Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाPak vs Ban: पाकिस्तानने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले

Pak vs Ban: पाकिस्तानने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले

लाहोर : आशिया चषक २०२३ (asia cup 2023) मधील सुपर ४मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने (pakistan) बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या संघाने आपल्या देशात २०० वा वनडे सामना खेळला.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघाला ३८.४ ओव्हरमध्ये १९३ धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या संघाने १९४ धावांचे आव्हान ३९.३ ओव्हरमध्ये पूर्ण केले. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक ७८ धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने नाबाद ६३ धावा केल्या.

याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजाच्या तिकडीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. हरिस रऊफने ४, नसीम शाहने ३ आणि शाहीन आफ्रिदीने १ विकेट घेतला. बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसनने ५७ चेंडूत ५३ धावा केल्या. तर मुशफिकुर रहीमने ८७ चेंडूत ६४ धावा केल्या.

बांगलादेशने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताच बदल केला नाही. पाकिस्तानच्या संघाने प्लेईंग ११ आधीच घोषित केली होती. बाबर आझमने आपल्या संघात बदल केला. मोहम्मद नवाजच्या जागी फहीम अश्रफला संधी दिली.

सुपर ४मधील पुढील सामना ९ सप्टेंबरला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात केआर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाईल. सुपर ४मध्ये ग्रुप एमधून भारत आणि पाकिस्तान पोहोचले आहेत. ग्रुप बीमधून श्रीलंका आणि बांगलादेश पोहोचलेत. सुपर ४मध्ये एक संघ ३ सामने खेळले. टॉप २ संघ फायनलमध्ये खेळतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -