Bharat: 'इंडिया' ऐवजी 'भारत' ला मुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा, केले ट्वीट

मुंबई: नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रात इंडिया (india) ऐवजी भारत (bharat) या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून देशात वातावरण चांगलेच तापले आहे.


जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्र समोर आल्यानंतर यावरून केवळ सवाल उपस्थित केले जात नाही आहेत तर भारत वि इंडिया असे महाभारत सुरू झाले आहे. भारत वि इंडियावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. एकीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की सरकार इंडिया शब्द हटवत आहे. तर भाजपाकडून यासाठी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो असे त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री


केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे.


देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is 'Bharat' असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे.


देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 'भारतमाता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.


साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला 'भारत' या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.


भारतमाता की जय!


 


भाजपचे अनेक मंत्री केंद्र सरकारने उचललेल्या या पावलाबद्दल कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र यावरून जोरदार टीका करत आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम