नाशिक : जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असलेल्या तक्रारदाराचे फिरते चित्रीकरणाचे वाहन जीएसटी भरारी पथकाने दंड न करता सोडून दिले होते. या मोबदल्यात संशयित लाचखोर राज्यकर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील (वय ३९, रा. कर्मयोगीनगर) यांना तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच (bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच लुचपत नाशिक विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर २५० दिवसात सव्वाशेहून अधिक लाचखोरांना गजाआड करून लोकसेवकांनी कर्तव्याशी केलेली प्रतारणा चव्हाट्यावर आणली आहे. या कार्यकाळात एसीबीने वर्ग एक, विशेष श्रेणी पासून शिपायापर्यंत सर्वच लोकसेवकांना त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतांना भेदभाव केल्याचे दिसत नाही, हे विशेष.
या प्रकरणाचा वृत्तांत असा की, तक्रारदार यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याची तक्रार दिली होती. तक्रारदाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी चित्रीकरणासाठी आलेले वाहन जीएसटी दंड न भरता जीएसटी भरारी पथकाचे प्रमुख संशयित जगदीश पाटील यांनी काही दिवसांपुर्वी सोडून दिले होते. त्या मोबदल्यात पाटील यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांच्या आदेशानुसार पोलीस निरिक्षक स्वप्निल राजपूत, नाईक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने वस्तु व सेवा कर कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
यावेळी संशयित पाटील याने सोमवारी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…