मुंबई : गणपतीच्या आगमनाला (Ganeshotsav) अवघे दोन आठवडे राहिले आहेत. मुंबईतल्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तर गणरायाचे आगमनदेखील झाले आहे. आता ओढ आहे ती गणेशचतुर्थीची. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारं लालबाग यंदाही भाविकांना खुणावत आहे. गणपतीसाठी सजावटीच्या वस्तू, प्रसाद, आरतीचं सामान, पूजेचं सामान अशा सगळ्याच गोष्टींनी लालबागसह दादर (Dadar) परिसर फुलला आहे.
लालबागचा राजा (Lalbaugcha raja) म्हणजे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षी लाखो भक्त केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. याच राजाचा मंडपदेखील सजवून झाला आहे. बाहेरच्या बाजूला आकर्षक अशी कमान तयार करण्यात आली असून त्यावर सुबक अक्षरात ‘लालबागचा राजा’ असं लिहिलं आहे.
प्रत्येकाला आपल्या घरात येणारा बाप्पा वेगळा दिसावा असं वाटत असतं. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या सोन्याच्या, मोत्यांच्या दागिन्यांनी मढवण्यात येतं. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी या आभूषणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. स्वस्त दरात ही खरेदी करण्यासाठी अगदी लांबून लोक लालबागच्या बाजारपेठेत येतात. यंदाही बाप्पाला सजवण्यासाठी फुलांचे हार, मोत्यांच्या माळा यांसारख्या विविध आभूषणांनी बाजारपेठा सज्ज आहेत. बाप्पाच्या भजनासाठी टाळ, मृदुंग यांसारखी वाद्येही दुकानांत सजवून ठेवण्यात आली आहेत.
बाप्पाला नैवेद्यात सगळ्यात जास्त आवडणारा मोदकही प्रचंड प्रमाणात विक्रीसाठी सज्ज आहे. मोठ्या आकारात मिळणारा प्रसादासाठी विशेष प्रसिद्ध कडक बुंदीचा मोदकही उपलब्ध आहे. बाप्पाला नैवेद्य म्हणून देण्यात येणारे २१ काजूंचे मोदक, मिठाई, लाडू या सगळ्यांची रेलचेल आहे.
गौरी-गणपती म्हणजे बायकांसाठी पर्वणीच. गौरीचं घरात आगमन झालं की बायकांना अत्यानंद होतो. तिला सजवणं, साडी नेसवणं, दागिन्यांनी मढवणं, नैवेद्याची तयारी करणं या सगळ्या गोष्टी त्या अगदी मन लावून करतात. लालबागच्या कार्यशाळांमध्ये या गौरीही सुंदर रितीने सजवून ठेवण्यात आल्या आहेत.
लालबागमधील या सगळ्या लगबगीची काही खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…