पल्लेकल: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (indian cricket team) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघाने आपला दुसरा सामना सोमवारी नेपाळविरुद्ध खेळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या खेळात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने सुपर ४मध्ये प्रवेश केला आहे. यासोबत क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा अखेरचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.
पाकिस्तान-नेपाळविरुद्ध दिसल्या कमकुवत बाजू
भारतीय संघाने आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६६ धावा केल्या होत्या. यात भारताला गोलंदाजी करता आली नाही.
क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची
नेपाळविरुद्ध भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत असल्याचे दिसले. सुरूवातीच्या २६ बॉलमध्येच भारताने ३ सोपे कॅच सोडले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीसमोर फ्लॉप दिसले.