Asia cup 2023: अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर विजय

लाहोर: आशिया चषकात (asia cup 2023) अफगाणिस्तान (afganistan) आणि श्रीलंका (srilanka) यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. विजयाचा घास अफगाणिस्तानच्या तोंडाजवळ आला होता. मात्र शेवटची विकेट पडली आणि श्रीलंकेने तो घास हिरावून घेतला.


शेवटच्या क्षणी अफगाणिस्तान जिंकेल असे वाटत होते. अफगाणिस्तानला विजयासाठी ३ धावा हव्या होत्या. त्यात शेवटचे दोन फलंदाज क्रीझवर होते. अफगाणिस्तानकडे चेंडूही भरपूर होते. मात्र त्यांची शेवटची विकेट पडली आणि अफगाणिस्तानच्या विजयी होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले.


श्रीलंकेने अफगाणिस्तानवर दोन धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद ९१ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानला विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. सुपर ४ फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेला या सामन्यात अफगाणिस्तानला काहीही करून हरवायचे होते.


श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने ९२ धावांची जबरदस्त खेळी केली. तर सलामीवीर पाथुम निसांकाने ४१ धावा केल्या. दिमुथ करूणारत्नेला ३२ धावांची खेळी करता आली.बाकी इतर फलंदाज अपयशी ठरल्याने श्रीलंकेला २९१ धावा करता आल्या.


प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. त्यांचे पहिले दोन सलामीवीर स्वस्तात परतले. गुलबदीन नाईबने २२ धावा केल्या. रेहमत शाहने ४५ धावा केल्या. हश्मतुल्लाह शाहिदीने ५९ धावा केल्या तर मोहम्मद नबीने ६५ धावांची खेळी केली.



सुपर ४मधून अफगाणिस्तान बाहेर, श्रीलंकेने मिळवले स्थान


श्रीलंकेविरुद्धच्या या पराभवासह अफगाणिस्तानचा संघ आशिया चषकाच्या सुपर ४मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेने सुपर ४मध्ये स्थान मिळवले आहे.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत