Raj Thackeray: जालना मराठा आंदोलन, राज ठाकरे घेणार आंदोलकांची भेट

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जालनामध्ये मराठा आरक्षण करणाऱ्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. यात राज ठाकरे (raj thackeray) यांनीही ट्विटरवर पोस्ट लिहित आपला निषेध नोंदवला होता.


त्यातच राज ठाकरे आता जालन्यामध्ये जाऊन या आंदोलकांची भेट घेणार आहेत. सोमवार ४ सप्टेंबरला ते जालना दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आंदोलकांची भेट घेणार आहेत तसेच यादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांचीही ते विचारपूस करणार आहे.


दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत जालना येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला होता. ते म्हणाले होते की,
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.


ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.
अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.


राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं).


मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत.


काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे.


माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील.


राज ठाकरे

Comments
Add Comment

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या