India vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

पल्लेकल: भारत आणि नेपाळ (India vs nepal) यांच्यात रंगलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १० विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला २३० धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरूवात केली मात्र त्याचवेळी पावसाने खोडा घातला.


पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर सामन्यातील षटके कमी करण्यात आली. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावा करायच्या होत्या. भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.


सलामीवीर रोहित शर्माने ५९ बॉलमध्ये ७४ धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने ६२ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. भारताने आपला एकही विकेट न गमावता नेपाळचे १४५ धावांचे आव्हान पूर्ण केले.


याआधी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे केवळ एकच गुण मिळाला होता. त्या सामन्यात भारताने फलंदाजी केली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. याच्या जोरावर पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला. त्यानंतर आता भारताने सुपर ४ची फेरी गाठली आहे.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.