Asia cup 2023: नेपाळविरुद्ध भारताला जिंकण्यासाठी हव्यात २३१ धावा

पल्लेकल: पाकिस्तानविरुद्धचा(pakistan) सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आशिया चषकमध्ये(asia cup 2023) भारताचा सामना आज नेपाळविरुद्ध (nepal) रंगत आहे. नेपाळने भारताला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने निर्धारित ५० षटकांत इतक्या धावा केल्या.


भारताला या सामन्यात जिंकायचे असल्यास इतक्या धावा कराव्याच लागतील. नेपाळची सुरूवात चांगली झाली. नेपाळच्या कुशल भुर्टेलने ३८ धावा केल्या तर आसिफ शेखने ५८ धावांची खेळी केली. खालच्या फळीतील सोमपाल कामीने ४८ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.


या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नाही आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.



भारतासाठी करो वा मरो


भारतासाठी हा सामना करो वा मरो आहे. भारताला सुपर ४मध्ये पोहोचायचे असेल तर नेपाळला हरवावेच लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातनंतर भारताकडे एक गुण आहे. पाकिस्तानचा संघ आधीच सुपर ४मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचा हा सामना जिंकावाच लागेल.

Comments
Add Comment

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.