झिम्बाब्वे : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणारा झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक (Heath Streak) याचं आज पहाचे तीनच्या सुमारास निधन झालं. तो केवळ ४९ वर्षांचा होता. १९९३-२००५ दरम्यान झिम्बाब्वेसाठी ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामने खेळणारा स्ट्रीक दीर्घकाळापासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होता. अखेर या लढाईत तो अपयशी ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी पसरली होती. झिम्बाब्वेचा खेळाडू हेन्री ओलांगा याने त्याच्या निधनाचे ट्वीट केले होते. अनेक क्रिकेटपटू व त्याच्या चाहत्यांनी यावर श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र काही वेळातच कर्णधाराच्या संदेशानंतर हेन्री ओलांगा यांनी ती बातमी अफवा असल्याचे सांगितले. तसेच, स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉर्टही शेअर केला होता. यावेळेस मात्र निधनाची बातमी पूर्णपणे खरी असल्याने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
हीथ स्ट्रीकची पत्नी नादिनने पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली की, आज पहाटे रविवार ३ सप्टेंबर २०२३, माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून देवदूतांकडे गेला आहे. त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. कुटुंबाकडून प्रेम हवे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू. हेन्री ओलांगाच्या एका ट्विटमुळे अलीकडे हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर स्ट्रीकने या अफवांचे खंडन केले आणि सांगितले की तो जिवंत आहे. अफवा पसरवणाऱ्यांनी त्याला दुखावले आहे, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…