Tuesday, May 20, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Asia Cup 2023: भारतीय संघाला मोठा झटका, स्पर्धेदरम्यान अचानक घरी परतला हा क्रिकेटर

Asia Cup 2023: भारतीय संघाला मोठा झटका, स्पर्धेदरम्यान अचानक घरी परतला हा क्रिकेटर

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ (asia cup 2023)स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह(jaspreet bumrah) आपल्या घरी परतला आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना सोमवारी ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात बुमराह खेळणार नाही आहे.


या दरम्यान, चांगली बातमी अशी की बुमराह लवकरच संघासोबत जोडला जाणार आहे. तो नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. मात्र त्यानंतर सुपर ४ साठी भारतीय संघात तो परतणार आहे. बुमराह वैयक्तिक कारणामुळे घरी परतत आहे.



दुखापतीनंतर बुमराहचे संघात पुनरागमन


दुखापतीनंतर बुमराहने नुकतेच संघात पुनरागमन केले आहे. बुमराहला पाठीच्या सततच्या दुखापतीमुळे या वर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये सर्जरी झाली होती आणि तेव्हापासून तो फिटनेस मिळवण्यासाठी NCA रिहॅबमध्ये होता. यानंतर त्याला सरळ आयर्लंड दौऱ्यात टी-२०चा कर्णधार बनवण्यात आले होते.


त्यानंतर बुमराहला आशिया चषक २०२३मध्ये भारतीय संघात सामील करण्यात आले. भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध शनिवारी खेळला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला. सामन्यात भारतीय संघाने पहिली बॅटिंग केली होती. मात्र पावसामुळे भारताला गोलंदाजी करता आली नाही.



शमी आणि सिराजच्या खांद्यावर जबाबदारी


दरम्यान, बुमराह नेपाळविरुद्ध सामन्यानंतर भारतीय संघात परतणार आहे. मात्र सोमवारी होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते. शमीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. अशातच भारताच्या गोलंदाजीची कमान मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्या खांद्यावर असू शकते. तर चौथा वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दिसणार आहेत.


आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन, अक्षऱ पटेल, शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा.

Comments
Add Comment