मुंबई : रुळ, ओव्हरहेड वायर, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार ३ सप्टेंबर रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात येतील, असे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड – माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि बेलापूर स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – मानखुर्द या मार्गावर विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकावरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध असतील.
दरम्यान येत्या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…