One nation, one election : एक देश एक निवडणुकीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीचे अध्यक्ष


नवी दिल्ली : 'एक देश एक निवडणुक' (One nation, one election) संदर्भात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेकदा ही संकल्पना मांडली आहे. आता त्यावर कएक पाऊल पुढे टाकत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. एक देश एक निवडणूक घेता येईल का या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या महत्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.


पावसाळी अधिवेशनानंतर कालच अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रामागे हेच कारण आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने 'एक देश एक निवडणुकी'चा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशातील विविध राज्यांत निवडणुकींवर होणारा खर्च कमी करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास संघराज्य पद्धतीवर परिणाम होईल, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे एक देश एक निवडणूक कधी आणि कशा प्रकारे लागू करण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिराच्या

Srinagar : अनंतनागमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला; जखमी हेड कॉन्स्टेबल हुतात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेड

COVID-19 Cases : आंध्र प्रदेशात कोरोनाचे ७ नवे रुग्ण, संख्या २६ वर

अमरावती : आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मंगळवारी राज्यात

Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

नवी दिल्ली : जुलै महिना संपायला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अद्याप देशात अपेक्षेप्रमाणे पाऊस

ISRO Recruitment 2026 : ISRO मध्ये थेट भरती! ४६२ अप्रेंटिस पदांसाठी २५ जुलैला थेट 'वॉक-इन इंटरव्यू'

तिरुवनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी

INS Malvan : भारतीय नौदलाची ताकद वाढली; नौदलाच्या ताफ्यात आता स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'मालवण' दाखल

- नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता होणार आणखी बळकट नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी