नवी दिल्ली : ‘एक देश एक निवडणुक’ (One nation, one election) संदर्भात केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेकदा ही संकल्पना मांडली आहे. आता त्यावर कएक पाऊल पुढे टाकत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. एक देश एक निवडणूक घेता येईल का या बाबींचा अभ्यास करण्यासाठी या महत्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर कालच अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रामागे हेच कारण आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘एक देश एक निवडणुकी’चा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशातील विविध राज्यांत निवडणुकींवर होणारा खर्च कमी करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास संघराज्य पद्धतीवर परिणाम होईल, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे एक देश एक निवडणूक कधी आणि कशा प्रकारे लागू करण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…