Bachchu Kadu : ...नाहीतर प्रत्येक गणपती मंडळात दानपेट्या ठेवून ती मदत सचिन तेंडुलकरांना देऊ

आंदोलनकर्त्या बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या एका गोष्टीवर थेट आक्षेप घेतला आहे. सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या (Online game) जाहिरातीवरुन पुन्हा एकदा बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले. मात्र घटनास्थळावरून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जुगारची जाहिरात करू नये, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होतं. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आंदोलनाचा इशारा देऊनही सचिन तेंडुलकर कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. 'आमचा क्रिकेटरने जाहिरात करण्याला विरोध नाही तर भारतरत्न (Bharatratna) सन्मानित व्यक्तीने जाहिरात करण्याला विरोध आहे. जर सचिन तेंडुलकर यांच्याकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं', असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले आहेत.



बच्चू कडू काय म्हणाले?


सचिन तेंडुलकरांचे चाहते खूप आहेत. त्यांचे परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर पडत आहेत. त्यामुळे आमची साधी मागणी आहे की एक तर तुम्ही जाहिरातीतून माघार घ्यावी किंवा भारतरत्न परत करावं. हे जर त्यांनी केलं नाही तर येणार्‍या गणेशोत्सवात प्रत्येक मंडळात आम्ही 'सचिन तेंडुलकर दानपेटी' ठेवणार आहोत. त्या दहा दिवस ठेवणार आणि मग सगळ्या दानपेट्या महाराष्ट्रातून जमा करुन सचिन तेंडुलकरांना देणार, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.



मुख्यमंत्र्यांना काय पत्र लिहिले?


यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांना पत्रदेखील लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरु असून त्यापैकी एक कंपनी पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. भारतरत्न सन्मानानं सन्मानित झालेल्या व्यक्तीनं अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणं लोकांच्या हिताचं नाही. त्यामुळे भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत ही देशवासियांसाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि