
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत (mumbai pune expressway) मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही शुक्रवारी या एक्सप्रेसवेवरून पुण्याला जाण्याचा प्लान बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेर शुक्रवारी सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केले जाणार आहे. तसेच ब्लॉकच्या या दोन तासांत ओव्हरहेड गँट्री बसवले जातील. याच गँट्रीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
त्यामुळेच शुक्रवारी दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर बसवले जाणारे सीसीटीव्ही वाहतुकीचे नियम उल्लंघन करणारे तसेच अपघाताला जे लोक कारणीभूत ठरतील त्यांच्यावर नजर ठेवणार आहेत.
ही आहे पर्यायी वाहतूक
या ब्लॉक दरम्यान खंडाळा येथून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली जाणार आहे. वळवण प